उष्ण आणि समिसतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते. यामुळे सतत फुले येतात हे लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादनासाठी आंबिया बहराचे नियोजन करावे. यासाठी योग्यवेळी ताण देणे महत्वाचे असते कोणते खत कोणत्यावेळी आणि किती प्राणात द्वावे हे जमीन, हवामान, झाडाचे वय आणि उत्पादनक्षमतेवर अवलंबून आहे.
आपली मोसंबी उत्पादकता १० ते १२ टन प्रति हेक्टर आहे याउलट प्रगत देशाची उत्पादकता २५ टन पती हेक्टरपर्यंत आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य बहर व्यवस्थापन, बागेची योग्य मशागत आणि एकात्मक खत व्यवस्थापनाचा योग्य वापर तसेच कीड व रोग नियंत्रण आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा