फुले ऊस १५००६ या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक आहे. क्षार जमिनीमध्ये या वाणाची उगवण क्षमता चांगली आहे. हा वाण जाड, उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा, पाचटावर कूस नसणारा आणि काणी रोगास प्रतिकारक आहे.
महाराष्ट राज्यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने अधिक ऊस उत्पादन (१६४ /टन) आणि अधिक साखर उत्पादन (२३.९२ टन) देणारा उसाचा नवीन वाण विकसित केला आहे. २०१२ पासून फुले ऊस १५००६ हा वाण केंद्र, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील चाचण्यांमध्ये उत्तम असल्याचे दिसून आले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा