प्रतिकूल परिस्थीवर मात करून शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून २६२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६०० टन द्राक्षांची निर्यात केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सून आणि परतीचा मान्सून जास्त प्रमाणात झाल्यामुळे वेळेवर द्राक्ष छाटण्या झाल्या नाहीत. आगाप छाटणी झालेल्या द्राक्षांचे नुकसान झाले परिणामी उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीतून काटेकोर व्यवस्थापन करून द्राक्ष बागा वाचवल्या आहेत.
https://agrowon.esakal.com/agro-special/sangli-grape-export-surges-3600-tons-sent-abroad-rat16