पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?
स्फुरद,पालाश,मँगेनीज, झिंक, बोरॉन व सिलिकॉन ही अन्नद्रव्ये व सॅलिसिलीक आम्ल, जस्मोनिक आम्ल ही संप्रेरके प्रतिकारशक्ती वाढवतात व पिकांना जैविक व अजैविक ताणापासून वाचवतात. स्फुरदामुळे मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे मुळकूज यासारख्या रोगाला बळी पडत नाही. पालाशमुळे पेशींचे बाहेरील आवरण जाड होते त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. मँगेनीज हा घटक लिग्निन व फेनॉल निर्मितीसाठी महत्वाचा आहे. […]
द्राक्ष्याचे घड जिरु नये म्हणुन काय करावे ?
फळछाटणीपुर्वी डोळे चांगले फुगलेले असल्यास छाटणीनंतर ७ दिवसात डोळे फुटण्यास सुरूवात होते, याचं अवस्थेला पोंगा अवस्था असे देखील म्हटले जाते. पोंगा अवस्थेत ढगाळ हवामान व सतत पाऊस राहील्यास, वातावरणात आद्रता १००% असल्यास, तसेच बोदामध्ये पाणी साचलेल्या परिस्थितीमध्ये नायट्रेट नायट्रोजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे जिब्रेलीनसचे प्रमाण वाढते व सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते. याचाच परिणाम वेलींवर निघणाऱ्या नवीन […]
द्राक्षाचे घड नरम राहण्यासाठी काय करावे ?
द्राक्ष घडाचा विकास होत असतांना घडाचा दांडा किंवा सांगाडा जेवढा लवचिक तेवढी घडातील मण्यांची वाढ जास्त चांगली होते. साधारणपणे ३ ते ४ मिमी आकाराचे मणी झाल्यावर पहिली डिपिंग घेतली जाते, त्यानंतर लगेच मण्यांची विरळणी केली जाते. विरळणीनंतर घड कडक झाल्याचे दिसून येतात कारण डिंपिंग किंवा घड बुडवणीसाठी विविध प्रकारची संजिवके वापरली जातात, ज्यामुळे मंण्याच्या व […]
देवाच्या पाण्यावरील माझे पीक लांबलेल्या पावसात तग धरेल?
पाण्याचे पिकामध्ये अन्यसाधारण महत्व आहे. पिकाच्या एकूण वजनाच्या ८०-९०% पाणी असते. पाण्यामुळे अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात तसेच साखरेचे वहनसुद्धा होते. जर एखाद्या पिकाला पाणी कमी पडले तर पिकामध्ये अजैविक ताण येतो व उत्पन्नात घट होते. ताण अवस्थेत पालाशची भूमिका खूप महत्वाची आहे कारण पालाश हे ताण अवस्थेत पर्णरंध्रांची उघडझाप व परासरण नियमन (osmoregulation) यावर नियंत्रण […]
तणनाशकाच्या वापराची परिणामकारकता कशी वाढेल?
बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय (अल्कलाइन) असतात. त्याच वेळी पाण्याचा सामूही विम्लधर्मीय असल्यास तणनाशकाची अर्धी कार्यक्षमता लवकर संपते. द्रावणाचा सामू ९ असताना त्याती अर्धी कार्यक्षमता १५ मिनिटांतच संपते. सात असताना अर्धी कार्यक्षमता २४ तासांत संपते. मात्र द्रावणाचा सामू ५ असताना हे तणनाशक कित्येक दिवसांपर्यंत क्रियाशील राहते. तणनाशक फवारणी करताना कमी ओलावा, आद्रता आणि जास्त तापमान कुटिकलची […]
तेलबिया पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे?
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १७ अन्नद्रव्यांपैकी सल्फर हा एक महत्वपूर्ण घटक आहे. गंधकाची गरज जवळजवळ स्फुरदाएवढी असून कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे. मेथिओनाईन (२१%), सिस्टेन (२६%) व सिस्टाईन (२७%) या ॲमिनो ॲसिड मध्ये सल्फर हा एक महत्वपूर्ण घटक आहे. जवळजवळ ९०% सल्फर हे या ॲमिनो ॲसिड मध्ये असते. सल्फर हा घटक तेलबियांमध्ये क्लोरोफिल, कोएन्झाइम् A […]
चांगल्या फुलनिर्मितीसाठी
फुलनिर्मितीस लागणारे सर्वात महत्वपूर्ण घटक म्हणजे कॅल्शियम, बोरॅान, झिंक. कॅल्शियमचा वापर हा पेशींच्या निर्मितीसाठी व विभाजनासाठी केला जातो. तो झाडांच्या पेशींमधील महत्वाचा घटक आहे. फ़ुलातील स्रीकेशर निर्मितीसाठी बोरॅान व पु्ंकेसर निर्मितीसाठी झिंक सर्वात महत्वाचा घटक आहे. पोलनटूयबची लांबी व जाडी वाढवण्यासाठी कॅल्शियम व बोरॅानची महत्वाची भुमिका आहे. परागकणांचे आयुष्य हे खुप कमी असते. परागीकरण १००% […]
खोड मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करावी ?
सुरूवातीच्या कालावधीमध्ये वनस्पतीला कायिक वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. कुठलीही होणारी वाढ पेशीची निर्मिती, पेशी विभाजन व पेशीची वाढ या क्रियांवर अवलंबून असते. पेशी निर्मितीसाठी व वाढीसाठी कॅल्शियम या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. पेशीभित्तिकेचा ९३% भाग कॅल्शियमने बनलेला असतो. कॅल्शियमचे वनस्पतींमधील वहन संथगतीने होते, वहनाचा वेग वाढविण्यासाठी बोरॉन महत्वाची भूमिका बजावते. तसेच पेशीविभाजनासाठी बोरॉन गरजेचे असते. वनस्पतीध्ये […]
केळीच्या चांगल्या निसवण्यासाठी काय करता येईल ?
केळीची लागवड झाल्यापासून साधारणपणे ५ ते ६ महिन्यांचा कालावधी कायिक वाढीचा असतो, यामध्ये खोडांची व पानांची निर्मिती खूप महत्वाची असते. केळीची वाढ पुढील उत्पन्नाचा पाया असतो, दर आठवड्याला एक पान या प्रमाणे महिन्याला ४ पांन व ६ महिन्यात २४-२६ नविन पाने आली तर केळीच्या खोडाची वाढ योग्यप्रकारे होत आहे असे समजावे. सामान्यत: ५.५ ते ६ […]
काडीमध्ये सुक्ष्म घड निर्मितीसाठी
खरड छाटणीनंतर १-३० दिवसांचा कालावधी वेलीच्या शाखीय वाढीचा असतो. या कालावधीच्या शेवटच्या टप्यात काडीवर डोळा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. यानंतर पुढील कालावधीमध्ये घड निर्मीतीची प्रक्रिया सुरू होते. ही अवस्था साधारणपणे ३१ ते ६० दिवसांची असते. काडीमध्ये सशक्त घड निर्मितीसाठी पुढिलप्रमाणे नियोजन करावे: पाणी व्यवस्थापन वेलवाढीचा जोम घड निर्मितीसाठी हानिकारक ठरतो, वेलींचा जोम अधिक […]