काडीची पक्वता
काडीमधील घडनिर्मितीची प्रक्रिया संपत असतांनाच काडीची पक्वता सुरू होते. हा कालावधी साधारणपणे ६० ते ९० दिवसांचा असतो. या अवस्थेत गुलाबी रंगाकडून काडी दुधाळ रंगात रूपांतर होण्यास सुरूवात होते. या काळात लवकर काडी पक्वतेसाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे वेलीचे व्यवस्थापन या कालावधीमध्ये वाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते, शेंड्याचा जोम नियंत्रित करण्यासाठी शेंडा पिंचिग करावे. तसेच बगलफुटी वेळेवर […]
घडाची लांबी कशी वाढवावी ?
दर्जेदार द्राक्ष निर्मितीमध्ये द्राक्षघड व द्राक्षमणी यांच्या आकारमानाला अनन्यसाधारण महत्व आहे. घडाची लांबी वाढविण्यासाठी घडाच्या देठाची व पाकळ्यांची लांबी वाढणे गरजेचे असते. घडाची लांबी वाढल्यामुळे मण्यांच्या आकारमान वाढीसाठी वाव मिळतो तसेच घडाला सुबकता प्राप्त होते. आकारमान वाढीसाठी पेशींची संख्या वाढीबरोबर पेशींची लांबी वाढणेदेखील महत्त्वाचे असते. प्रिब्लुम अवस्थेत GA3 च्या वापराने पेशींची संख्या वाढते व लांबीदेखील […]
कपाशीचा धागा कसा वाढेल?
कापूस पिकाला बोरॉन सर्व वाढीच्या अवस्थेत लागतो परंतु जास्त प्रमाणात हा बोंड विकासासाठी लागतो, तसेच कापसामध्ये परागीकरणासाठी, फळधारणेसाठी व धाग्याच्या उत्तम प्रतिसाठी आवश्यक आहे. बोरॉनमुळे कापूस पिकात नत्राचा व पालाशचा वापर चांगल्याप्रकारे होतो. नत्र आणि कार्बोहायड्रेट्स पानापासून बोंडांकडे नेण्यास मदत होते. बोरॉनमुळे मिश्र कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पचण्यास तसेच कॅल्शिअम उचलण्यास व नेण्यास सुद्धा मदत होते. […]
कणसामध्ये दाणे चांगले कसे भरतील?
झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य एन्झाईम्सना चालना देते, त्यामुळे त्याची मदत प्रथिने निर्मितीसाठी होते. झिंक क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट्स निर्मितीसाठी गरजेचे आहे, झिंकच्या पुरेशा पुरवठ्याने पराग कणांच्या दर्जामध्ये व काही अंशी त्यांच्या आयुष्यमानात वाढ होते. दर्जेदार पराग कणांनी बीजधारणा चांगली होते व कणीस भरण्यास मदत होते. पालाश हा घटक प्रकाश संश्लेषण क्रिया आणि अन्न निर्मितीत सहभाग घेतो. […]
द्राक्षबागेमध्ये एकसारख्या फुटींसाठी काय करावे ?
खरडछाटणी झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी द्राक्षबागेत फुटी निघायला सुरवात होतांना दिसून येते. या काळामध्ये द्राक्षबागेत अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. कारण काडीची शाखीय वाढ, घडनिर्मीती व वेली मधील होणारा अन्नसाठा हे सर्व घटक एक सारख्या फुटींसाठी आवश्यक आहेत. १) पाणी व्यवस्थापन : सुरूवातीच्या ३० ते ३५ दिवसात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी, […]
मालाचे वजन व चव वाढवण्यासाठी काय करावे?
पालाश हा पिकाच्या पेशीमध्ये पाणी, अन्नद्रव्ये आणि कार्बोहायड्रेटस वहनासाठी गरजेचा आहे. एन्झाईमना चालना देण्यासाठी, पालाश महत्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रथिने, स्टार्च आणि एटीपी निर्मिती होते. एटीपी निर्मितीमुळे प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो. पालाशमुळे पर्णरंध्रांची उघडझाप सुद्धा नियंत्रित होते कि ज्यामुळे पिकाच्या पानातील पाण्याची वाफ, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड अदलाबदल `करण्यास चालना मिळते.पिकातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि काही […]
मुळांच्या सुदृढ वाढीसाठी काय करावे ?
पांढरी मुळी ही झाडाचा आत्मा आहे ज्यामुळे सर्व अन्नद्रव्य पिकामध्ये शोषली जातात. झाडाची पांढरी मुळी ही पाणी व अन्नद्रव्य शोषण करते. अति प्रमाणात पाणी झाल्याससुद्धा मुळी बंद होते.किंवा मुळकुज होते. जर झाडाची मुळी सुरु नसेल तर त्याची वाढ खुंटते, फुलगळ होते, रोग, कीड, विषाणूस बळी पडते, फळांचा आकार व झाडांचा विकास होत नाही. प्रत्येक २५ […]
विषाणूजन्य रोगांपासून बचाव
आपल्याला माहित आहे की विषाणू पसरविण्याचे काम पिकामध्ये वेक्टर्स म्हणजे रोगवाहक करतात. पिकामध्ये अफिडस् २७५ प्रकारचे, पाढरीमाशी ४५ प्रकारचे, थ्रिप्स १० प्रकारचे विषाणू पसरवितात. म्हणून सर्वप्रथम विषाणूंचा प्रसार करणारे किटक यांच्या विरुध्द पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण क़रण्यासाठी कॅलोस सिन्थेसिसची क्रिया जागृत करणे गरजेचे असते. त्यासाठी पिकाला कॅल्शियमची ग़रज असते. कॅल्शियमच्या फवारणीने पिकातील कॅलोस सिन्थेसिसची क्रिया २१ […]
विषाणूजन्य रोगांविरुद्ध पिकामध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढवता येते?
पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रसार रसशोषक किडींमार्फत होत असतो, त्यांनाच व्हेक्टर्स म्हटले जाते. पिकामध्ये अफिडस्( मावा )२७५ प्रकारचे, पांढरीमाशी ४५ प्रकारचे, थ्रिप्स १० प्रकारच्या विषाणूंचा प्रसार करतात. म्हणून सर्वप्रथम विषाणूंचा प्रसार करणाऱ्या किटकांविरूद्ध पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण क़रण्यासाठी कॅलोस सिन्थेसिसची क्रिया जागृत करणे गरजेचे असते. त्यासाठी पिकाला कॅल्शियमची ग़रज असते. कॅल्शियमच्या फवारणीने पिकातील कॅलोस सिन्थेसिसची क्रिया २१ […]
शोभेच्या झाडांना अधिक फुले येण्यासाठी काय करावे?
शाखीय वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी नत्र व स्फुरदची गरज असते. नत्राचा वापर ॲमिनो ॲसिड व प्रथिनांच्या संश्लेषणासाठी लागणारे बिल्डिंगब्लॅाक तयार करण्यासाठी केला जातो. तसेच न्युक्लिक ॲसिड, हरितद्रव्य व एन्झाईम निर्मितीसाठी नत्र गरजेचे असते. स्फुरद वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असणारा आहार आहे. स्फुरद वनस्पतींमधील विविध प्रकारच्या क्रियांमध्ये सहभागी असतो जसे की, प्रकाशसंश्लेषण, वनस्पती श्वसन, मुळांच्या निर्मितीसाठी, फुलांच्या […]