ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यावर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात येत्या काळात हरभऱ्याचे दर दबावात राहतील, अशी भीती वर्तवली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे. अशातच जानेवारी २०२५ मध्ये ऑस्टेलियाचा हरभरा बाजारात येणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये यंदा हरभऱ्याचे बंपर उत्पादन हिऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळेच मोठ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑस्ट्रिलियातून भारताला हरभरा पाठविण्यावर भर दिला आहे. यंदा पहिल्यांदाच गेल्या एक दशकाच्या तुलनेत हरभऱ्याचा दर्जा आणि उत्पादन चांगले असल्याने ऑस्टेलियाशी हरभऱ्याकरिता व्यापारी स्थरावर आगाऊ सौदे केले जात आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा