जालना जिल्ह्यातील कडवंची नंदापूर धारकल्याण पीरकल्याण आदी दहा ते बारा गावांत कमी-अधिक प्रमाणात द्राक्ष शेती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. कडवंचीने तर शेततळ्याच्या पाण्यावर द्राक्ष शेतीचे मॉडेलच उभे केले. परंतु यंदा हवामान अनुकूल असले, तरी एकूण बागांपैकी ५० टक्केच बागा उत्पादन देतील अशी स्थिती असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
नंदापूर गावशिवारात सुमारे साडेतीनशे तर साडेचारशे एकर द्राक्ष बागा होत्या तिथे यंदा मुश्किलीने ९० एकर बागाच शिल्लक असल्याची माहिती माजी सरपंच दत्तू चव्हाण यांनी दिली. त्यातही यंदाचा हंगाम कसाबसा कडून २५ ते ३० टक्के बागा त्यामधूनही कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी क्लिक करा