चालू वर्षी देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटे अंगावर घेत आपला शेतीमाल कसाबसा पिकवत किमान शेतीसाठी झालेला खर्च काढण्यासाठी पराकाष्टा केली. कांदा अन द्राक्षाची पंढरी असलेल्या जिल्ह्यात द्राक्ष उत्पदकांपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी अधिक रडकुंडीस आला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोनच महिने कांदयाला सरासरी ४५०० रुपये हा समाधानकारक भाव मिळाला. उर्वरित दहा महिने मात्र कांद्याने शेतकऱ्यांना रडविलेच सध्या तर कांदा भाव फक्त १२०० रुपये आहे दुसरीकडे मात्र पीक विमा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
अधिक माहितीसाठी क्लिक करा