कोणत्याही पिकाच्या नवीन वाण संशोधनामध्ये पूर्वी विकसित वाणांच्या तुलनेत नवा वाण कसा सरस आहे, याचा तुलनात्मक अभ्यास हा नेहमीच केला जातो. आधी विकसित मालाच्या तुलनेत कीड रोगास प्रतिकारक्षम, धिक उत्पादनक्षम याचबरोबर इतर काही खास गुणवैशीष्ट्ये असतील तरच अशा वाणास संबंधित संस्थांकडून मान्यता मिळते. त्यामुळेच वाण संशोधकांचा कल देखील शेतकरी तसेच ग्राहकांची मागणी आणि पूर्वीपेक्षा गुणवत्तेत सरस वाण विकसित करण्यावर असतो.
एनएचआरडीएफ आर्थिक राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान या संस्थेने निवड पद्धतीने ‘एल ८८३’ हा वाण विकसित केला आहे. खरीप व लेट खरीप लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या या वाणाचा कालावधी ८० ते ८५ दिवस, तर उत्पादनक्षमता प्रतिहेक्टर ३२ ५ टन आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा