भारत देशाची अर्थव्यवस्था हि बहुतांश शेती व्यवसायावर अवलंबून आहे १९६० मध्ये झालेल्या हरित क्रांतीमुळे शेती मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्दतीने होऊ लागली. व भारताच्या प्रचंड लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्याचे उत्पादन देशातच होऊ लागले. कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा केवळ शेती व्यवसायामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा विपरीत परिणाम झाला नाही.
अन्नधान्याच्या उप्लब्धतेसाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा खुप मोठ्या प्राणावर होऊन मातीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. माती -पाणी-पर्यावरण प्रदूषणाचा धोका वाढत आहे .पर्यावरणासह मानवी आरोग्याची हानी टाळण्यासाठी व रासायनिक निर्विष्ठांचा अतिरेक टाळून उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून उदयास आलेली शेती उत्पादने म्हणजेच जैव उत्तेजके अर्थात बायोस्टीमुलॅन्टस.

https://agrowon.esakal.com/agro-special/the-present-and-future-of-biostimulants-article-on-agrowon-rat16

माहिती शेअर करा