चालू हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. देशातील अंदाजित उत्पादनापैकी जवळपास ४१ टक्के कापसाची विक्री ३१ डिसेंबर झाली. पहिल्या तिमाहीचा विचार करता यंदाची आवक गेल्या वर्षापेक्षा जास्त होती, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.
कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरु होतो. म्हणजेच कापसाचा हंगाम सुरु होऊन आता ३ महिने पूर्ण झाले यंदाच्या पहिल्या तिमाहीत कापसाची आवक गेल्या वर्षापेक्षा जास्त राहिली. विशेष म्हणजे कापसाचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असे नाहीत महिनानिहाय कापूस आवकेचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात १७ लाख ५२ हजार गाठी आवक झाली होती.
अधिक माहितीसाठी क्लिक करा