मागील काही वर्षात बदलत्या हवामानामुळे विशेषतः अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या नुकसानीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या काही बागायतदारांनी द्राक्ष बॅग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. निफाड भागात गारपिटीमुळे नुकसान होऊ नये म्हणून द्राक्ष बागेत प्लास्टिक कव्हरचा वापर वाढला आहे. मागील काही वर्षात बऱ्याच भागांमध्ये प्लास्टिक कव्हर लावले गेले काहींना यात यश मिळाले. तर काहींना अजूनही तांत्रिक अडचणी आहेत. द्राक्ष बागेत लावल्या जाणाऱ्या प्लास्टिकबाबत अजून आवश्यक तेवढी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. किंबहुना वेगवेगळ्या द्राक्ष विभागांमध्ये हवामानाशी निगडित बागेतील धोक्याची कारणे वेगवेगळी आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा