नाशिक ही द्राक्षपंढरी म्हणून ओळखली जाते. चालू हंगामात अनेक संकटे अंगावर घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी अर्ली द्राक्षाच्या निर्यातीला वेग दिला आहे. रशिया, मलेशिया अन संयुक्त अरब अमिरातीसाठी महिनाभरात द्राक्षाचे १०९ कंटेनर समुद्रामार्ग रवाना झाले आहेत. १७६४.५३ मेट्रिक टन द्राक्ष यातून विदेशातील बाजारपेठेत पोहचले.
मागील वर्षाच्या तुलनेत पावसामुळे हंगाम यंदा दोन आठवडे लांबला सटाणा, देवळा भागातून या हंगामात अर्ली द्राक्षाची निर्यात होत असते. वर्षभरात नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या हंगामात साधारणपणे तीन हजार कंटेनर युरोपसह, श्रीलंका, युएई आदी देशांमध्ये रवाना होतात नाशिकहून युरोप, रशिया, कॅनडा, जर्मनीला द्राक्षाची निर्यात केली जाते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा