स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची हिरवी मिरची थेट दुबईला निर्यात करण्यात यश आले आहे. या माध्यमातून या भागातील शेतकरी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा पल्ला गाठला असून पहिल्या प्रयत्नांद्वारे सुमारे १५ टन हिरव्या मिरचीची निर्यात करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामधून उत्पादक कंपन्या शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करीत आहेत. त्या माध्यमातून त्या त्या भागात शेतीमालाच्या मूल्यवर्धनाचा उद्देश साधला जात आहे. त्यापुढील टप्यात कंपन्यांनी पॅकिंग व ब्रॅंडिंगवर देखल भर दिला आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा