हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागासंबंधीची कार्यवाही १ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. ३१ पर्यंत या योजनेत केळीसह अन्य फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. परंतु विमा योजनेसंबंधीचे पोर्टल तब्बल सात ते आठ दिवस बंद होते. यामुळे अनेक केळी उत्पादक योजनेत सह्भाग घेऊ शकले नाहीत.
खानदेशात फळ पीकविमा योजनेत केळी उत्पादक अधिकच सह्भाग घेतात. यंदा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी विमा हप्ता कमी करण्यात आला आहे. तसेच विमा परतावा रकमेतही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना केळी पिकास विमा संरक्षण घेण्यासंबंधी हेकटरी आठ हजार पाचशे रुपये विमा हप्ता भरायचा आहे.
बँका, सर्व्हिस सेंटरच्या (सीएससी) माध्यमातून फळपीक उत्पादक शेतकरी या योजनेत सह्भाग घेऊ शकतात. जळगाव जिल्यातील सुमारे ५५ ते ६० हजार शेतकरी या योजनेत सहभागी होतील, असे संकेत आहेत कारण केळीची लागवड जळगावात यंदा २० टक्यांनी वाढली आहे केळी लागवड सुरूच आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा