द्राक्षापासून उत्पादित बेदाणा (मनुका) यास कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा (जीएसटी) करातून वगळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली या पाठपुराव्याला यश आले आहे. वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये बेदाणा करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक शनिवारी जैसलमेर येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हळद, गूळ याप्रमाणेच बेदाणा कृषी उत्पादन असल्याने त्याला वस्तू व सेवा करातून वगळण्याची शिफारस मंत्री तटकरे यांनी केली होती. त्यास परिषदेत मान्यता देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा