सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र सव्वा लाख एकर असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे म्हणणे आहे. तर कृषी विभागाकडील माहितीत ७७ हजार एकराची नोंद आहे. मग सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील एकूण क्षेत्र किती, संघ आणि कृषी विभाग यांच्या आकडेवारीत इतकी तफावत कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सांगलीसह नाशिक,पुणे, सोलापुर या विभागांतील द्राक्ष क्षेत्राच्या आकडेवारीतही मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. या गोंधळाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत असून, यामुळेच नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान बऱ्याचदा नुकसान भरपाईपासूनही वंचित राहण्याची वेळ त्याच्यावर येत आहे. द्राक्ष बागायतदार संघ आणि कृषी विभाग यांनी तातडीने तोडगा काढावा, कशी मागणी राज्यभरातील द्राक्ष उत्पादक करीत आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा