अलीकडच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे आव्हान असतानाही, नाशिक जिल्ह्याच्या कृषी विभागाने या हंगामात सुमारे १.६ लाख टन द्राक्ष निर्यात करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या मुख्य द्राक्ष हंगामामुळे या काळात निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
२०२३-२४ हंगामासाठी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील १०,३०० शेतकऱ्यांनी १०,२५३ हेक्टर द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. द्राक्षे आंतरराष्ट्रीय निर्यात मानके पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी सरकारी नियमांनुसार हि नोंदणी अनिर्वाय आहे.
गेल्या हंगामात (२०२३-२४), नाशिकमधून १.५७ लाख टन द्राक्षे निर्यात झाली जी २०२२-२३ मधील १.५३ लाख टन निर्यातीच्या तुलनेत २% वाढ झाली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा