अलीकडच्या काळात कीडनाशकांच्या अविवेकी वापराने प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये किडींमध्ये वाढलेली प्रतिकारशक्ती, मित्रकीटकांची कमी होत चाललेली संख्या, दुय्यम किडींचा उद्रेक, दूषित झालेले पर्यावरण आदींचा समावेश होतो. या समस्या कमी करण्यासाठी “एकात्मिक कीड व्यवस्थापन’ पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे. त्यात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा