सकाळ ॲग्रोवनच्या ‘आयकॉनिक ब्रॅण्डस इन ॲग्रीकल्चर’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते बुधवारी दिनांक २६-६-२०२४ रोजी पुणे येथे झाले. यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक कृषी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सन्मानार्थी उद्योजकांमध्ये श्री.महेश दामोदरे संचालक धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे देखील उपस्थित राहिले होते.
धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे कंपनीचे संचालक श्री.महेश दामोदरे व श्री.अमित खटोड यांनी सन २००७ साली या कंपनीची स्थापना केली.भारतातील बाजारपेठेत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, विषविरहित पोषक अन्नद्रव्ये विपणन करणारी व वेगाने प्रगती करणारी कंपनी म्हणून कंपनीने अल्पावधी मधेच आपली ओळख निर्माण केली.
या कार्यक्रमामध्ये कृषी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन दिले गेले.

माहिती शेअर करा