गेल्या दोन ते तीन वर्षात देशातील डाळिंब पिकांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले होते. परिणामी डाळिंबाची उत्पादनात घट असूनही डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत जगभरातील ४५ ते ५० देशांतील बाजारपेठेत डाळिंबाची निर्यात झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा डाळिंब निर्यातीत वाढ होऊ लागली असल्याचे चित्र आहे. सन २०२३-२४ या वर्षात डाळिंबाची ७२ हजार ११ टन निर्यात झाली असून, सन २०२२-२३ च्या तुलनेत ९हजार ७३२ टनांनी निर्यात वाढली आहे निर्यात वाढीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा