मॉन्सूनोत्तर पावसाने सप्टेंबर महिन्यांच्या सुरवातीला नाशिक विभागात द्राक्ष पिकाला दणका दिला. त्यामध्ये आगाप छाटण्यामध्ये बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत पीक संरक्षण खर्च वाढता राहिला. त्यामध्ये पारंपरिक वाण व लांबट वाणांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादनात २५ टक्क्यापर्यंत यंदा घट शक्य असल्याचे चित्र आहे.
सप्टेंबरमध्ये छाटणी सुरु झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांच्या दुसऱ्या सप्ताहात पावसामुळे द्राक्ष उत्पादक पट्ट्याला जास्त तडाखा बसला. द्राक्षबागांमध्ये डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला तर घड कमीनिघण्यासह ते कमकुवत निघाल्याचे दिसून आले. तर गोळी घड होऊन कोवळ्या फुटींचे नुकसान आहे. त्यामुळे सुरवातीच्या टप्यात द्राक्ष उत्पादन घट होण्याचे प्रमाण अधिक असेल.
अधिक माहितीसाठी क्लिक करा