डाळवर्गीय शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने देशांतर्गत वाटाणा आयातीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १२.५४ लाख टन आयात भारतात झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचा तुरीसह इतर डाळवर्गीय शेतीमालाच्या दरावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
निर्यात क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जुलैपर्यंत ९.३२ लाख टन, ऑगस्टमध्ये ४३,२४०, सप्टेंबर २७,७३२, ऑक्टोबरमध्ये २.५ लाख टन याप्रमाणे आतापर्यंत सुमारे १२.५४ लाख टन वाटाणा आयात भारतात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सूत्राच्या मते, एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत १२.५४ लाख तर डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत २४.२३ लाख टन वाटाणा भारतीय बंदरावर पोहोचला.
अधिक माहितीसाठी क्लिक करा