यंदा अति पाऊस, परतीचा पाऊस याचा फटका राज्यातील द्राक्षाला बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतहि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बाग साधल्या आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे आले असून, राज्यात आजअखेर १ हजार ४८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे ,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्यात गतिवर्षी पाण्याची टंचाई आणि गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना बसला होता. दरम्यान, द्राक्ष निर्यात सुरु असतानाच सुएझ कालवामार्ग वाहतूक बंद असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी नैर्सगिक संकटावर मात करत दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेऊन द्राक्षाची निर्यात केली. द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करते त्यानुसार शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीसाठी पुढे येत असतो.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा