प्रतिकूल हवामानाचा परिणाम यावर्षी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मिती झालीच नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे.
यावर्षी द्राक्ष उत्पादनात सुमारे ५०टक्के घट होणार आहे याचा फटका सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील प्रामुख्याने काळ्या जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे. त्यामुळे सुमारे दीडशे एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. जुन्या द्राक्ष बागा काढून पावसाळी वातावरणात तग धरणाऱ्या नवीन परदेशी पेटंट व्हरायटीच्या द्राक्ष बागा लावण्याच्या तयारीत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा