लसूण हे मसालावर्गीय नाही तर भाजीपाला पीक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात लसूण पीक हे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त झाले असून, आता शेतकऱ्यांना त्याची कोठेही विक्री करता येणार आहे. त्यासोबतच या निकालामुळे गेल्या आठ वर्षांपासून सुरु असलेल्या वादावरही पडदा पडला आहे.
बाजार समिती कर्मचाऱ्याच्या उपस्थितीतच लिलाव होत लसणाचे व्यवहार करण्याची पद्धती मध्य प्रदेशात रूढ आहे. इतरत्र कोठेही लसूण विक्रीला परवानगी नव्हती. मात्र या निर्बंधामुळे लसूण उत्पादकांना अपेक्षित मोबदला मिळत नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची होती यावरून अनेकदा आंदोलने झाली. त्याची दखल घेत मध्य प्रदेश पणन मंडळाने २०१५ मध्ये लसणाचा समावेश भाजीपाला श्रेणीत करीत याला निर्बंधमुक्त केले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा