केंद्रीय बियाणे अधिनियम,१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणांचा समावेश भारताच्या राज्यपत्रात करण्यात आला.
याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून राजपत्राचा नोंदणी क्रमांक एस ओ ४३८८(अ) असा आहे. सादर पाच वाणात विद्यापीठ विकसित देशी कापसाचा पीए ८३३ व अमेरिकन कापसाचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे.
देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यपीठाच्या पाच पीक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ.खिजर बेग यांनी दिली.
अधिक माहितीसाठी क्लिक करा