राज्यात द्राक्षांची फळछाटणीला गती आली असून, आजअखेर सुमारे ८०% द्राक्षांची फळछाटणी आटोपली आहे. येत्या पंधरवड्यात फळछाटणी संपेल संख्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलाचा फटका बागेला बसल्याने काही अंशी डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.
द्राक्ष संघाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पन्नास टक्के फळछाटणी झाली होती. मात्र या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बाग साधल्या आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा