सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमार्फत होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते.
रोगाचे संक्रमण फुलोरा अवस्थेतील पिकास झाल्यास, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७० दिवसांपर्यंत झाल्यास अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.
अनुकूल घटक
१. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी मार्फत होतो
२. दाट पेरणी, नत्रयुक्त खतांचा अतिवापर आणि रोगवाहक पांढरी माशी या घटकांमुळे या रोगाचे प्रमाण वाढते
अधिक माहितीसाठी क्लिक करा