‘पृथ्वीकडे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे आहे, परंतु प्रत्येकाच्या लोभासाठी नाही’- महात्मा गांधी पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ८ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! ज्या मातीच्या १ ग्रॅम निर्मितीसाठी १००० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. त्या मातीला “मातीमोल”म्हणून तिची किंमत शून्य ठरविणारे आम्ही किती कृतग्न्य ! मानवी शरीरावर जसे त्वचेचे आवरण आहे, तसे मातीचे पातळ आवरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रिया द्वारे मातीच्या जडणघडणीचे काम करतात म्हणून माती हे सजीव माध्यम आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा