दसरा दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा पहिल्यांदाच चांगला दर मिळाला. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील बाजारात यंदा दसऱ्याला झेंडू शंभर ते दोनशे किलोपर्यंत विकला गेला अस्टर, शेवती यासह अन्य फुलांचे दरही तेजीत होते.
अहिल्यानगर तालुक्यासह राहता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले भागांतही फुलांच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देतात. अस्टर, शेवती, गुलाब व अन्य फुलांना चांगला दर असतो. मात्र झेंडूच्या फुलांचा दर बहुतांशवेळा कवडीमोल असतो. गेल्यावर्षी दसऱ्याला अहिल्यानगरमध्ये झेंडू केवळ वीस रुपये किलोने विकला जात होता.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा