एर्बॅटो

श्रेणी - ॲडजुवंट

उत्पादक - रोवेन्सा नेक्स्ट

स्रोत देश - स्पेन

सर्व प्रकारच्या पिकांसाठी विशेष सहाय्यक (अ‍ॅडजुवंट)

वर्णन

एर्बॅटो हे एक उच्च-क्षमतेचे ॲडजुवंट आहे, जे फवारणीचे द्रावण पानांवर व्यवस्थित पसरवण्यासाठी आणि ते झाडाच्या आत शोषण्यासाठी तयार केलेले आहे. हे कीटकनाशके, बुरशीनाशके आणि विद्राव्य खतांचा प्रभाव दुप्पट करण्यास मदत करते. वैशिष्ट्ये : १. हायब्रिड तंत्रज्ञान: हे एकाच वेळी स्टिकर, स्प्रेडर आणि पेनिट्रेटर म्हणून काम करते. २. सुपर स्प्रेडिंग: फवारणीचे थेंब पानावर पडताच ते संपूर्ण पानावर एकसमान पसरवण्याचे काम करते. ३. द्रुत शोषण : औषधाला पानांच्या कडक आवरणातून वेगाने आत नेण्यास मदत करते. ४. पावसापासून संरक्षण: फवारणीनंतर लवकर पाऊस आला तरी औषध धुवून जाण्यापासून रोखते. ५. बाष्पीभवन नियंत्रण: कडक उन्हात औषधाचे बाष्पीभवन होण्यापासून वाचवते, ज्यामुळे औषध जास्त काळ पिकावर टिकते. फायदे : १. औषधाची कार्यक्षमता वाढते २. औषध वाया जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होते. ३. पिकावर लवकर परिणाम दिसून येतो. ४. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन मिळते

उपलब्ध पॅकिंग

१०० मिली

२०० मिली व ४०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे :१-२ मिली / लिटर पाण्यासाठी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch