आपल्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात अनुकूल वातावरण, भरपूर सूर्यप्रकाश, सुपीक जमीन,मुबलक पाऊस यासह भौगोलिक परिस्थिती शेतीसाठी फायदेशीर आहे. त्याला काही वर्षात संकरित पीक वाण, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण यांची जोड मिळाल्याने उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. फलोत्पादनात भारताचा जगात दुसरा, तर भाजीपाला उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो.
जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ८.३ टक्के फळे आणि १२ टक्के भाजीपाला भारतात पिकतो. अन्नधान्याच्या (भात, ज्वारी, गहू व भुईमूग इ.) उत्पादनात भारत जागतिक स्तरावर पहिल्या पाचांमध्ये आहे. मात्र या उत्पादित मालापैकी केवळ चार ते पाच टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. वेगवेगळ्या शेतीमालाच्या व प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विशेषतः फळे व भाजीपाला क्षेत्रात निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा