मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. त्याकरिता येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता(ए आय) आधारित व्यवस्थापन प्रणाली राज्य सरकार विकसित करत आहे. यामुळे हिंस्र प्राण्याचा वावर वेळीच लक्षात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आर्वी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-to-use-ai-to-prevent-human-wildlife-conflicts

माहिती शेअर करा