सप्टेंबरमध्ये गोडी बहार छाटणीवेळी अतिवृष्टी तर नंतर डिसेंबरमध्ये मान्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी , द्राक्ष उत्पादनात यंदा ४० टक्क्यांवर घट आल्याचे समोर आले. मालाची कमी उपलब्धता, त्यात गुणवत्ता व गोडीमुळे दर टिकून होते. मात्र गेल्या १० दिवसांपासून दरात किलोमागे सरासरी १५ ते २० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने अंतिम टप्प्यात द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी कडू ठरत आहे.
देशांतगर्त बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी द्राक्ष खरेदी सुरु असताना यंदा समाधानकारक दर मिळत होते. उत्पादकता घटल्याने मिळणाऱ्या दरामुळे यंदा शेतकरी समाधानी होता.
https://agrowon.esakal.com/agro-special/grape-farmers-hit-hard-as-prices-crash-in-final-phase-rat16