राज्यातील अंतिम द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. त्यातच देशभरातील बाजारपेठेत फळांची आवक झाल्याने द्राक्षाचा उठाव कमी झाल्याने द्राक्षाच्या दरात प्रति किलोला पंधरा रुपयांनी घट झाली आहे. सध्यस्थितीला २० टक्के क्षेत्रावरील हंगाम बाकी आहे.
यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासूनच दर टिकून होते हंगामाच्या मध्यावर द्राक्षाच्या दरात वाढ झाली. बाजारपेठेत द्राक्षाची आवक कमी असल्याने द्राक्षाचा उठावहि चांगला होता त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

https://agrowon.esakal.com/agro-special/final-phase-of-grape-season-sees-lower-demand-and-falling-rates

माहिती शेअर करा