पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीत कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकलोपत्तर वेबमिनारमध्ये ”मिशन फॉर कॉटन ” या विषयावर चर्चा झाली. पाच वर्ष कालावधी असलेल्या या प्रकल्पाकरिता तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रति वर्ष सरासरी ५०० कोटी रुपयांचा खर्च करीत कापसाच्या उत्पादकता व गुणवत्तेवर सुधारणांचा उद्देश याद्वारे साधला जाणार आहे.
वेबमिनारमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था,भारतीय कापूस महामंडळ त्यासोबतच प्रयोगशील शेतकरी, कापूस मूल्यवर्धन व उत्पादकता, गुणवत्ता सुधार या साखळीतील भागधारक सहभागी झाले होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/provision-of-rs-2500-crore-for-mission-for-cotton-a-new-boost-for-cotton

माहिती शेअर करा