भारतीय द्राक्षासाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेची दारे उघडी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उभय देशांमध्ये सकारात्मक चर्चा चालू असून,न्यूझीलंडचे एक शिष्ट मंडळ सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड व भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी, मुंबईतील अपेडाच्या कार्यलयात झाली चर्चेत अपेडाच्या महाव्यवस्थापिका विनिता सुधांशु, उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे,फलोत्पादन संचालक डॉ.कैलास मोते, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती अलगीकरण विभागाचे सहसंचालक डॉ.एस ग्यानसंबंधन तसेच न्यूझीलंड शिष्टमंडळातील केरेन पौंग, श्रीमती लिली ब्रेलफोर्ड तसेच श्रीमती आदर्शांना मिस्त्री यांचा समावेश होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/new-zealand-delegation-visits-maharashtra-to-explore-grape-imports-rat16?utm_source=website&utm_medium=related-stories

माहिती शेअर करा