मॉन्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. २) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या तापमानासह उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मॉन्सून कमजोर होताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तर उन्हाचा चटका आणि उकाडा पुन्हा वाढला आहे. आज (ता. २) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनची चाल थांबली

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळसह, महाराष्ट्रात सर्वसाधारण वेळेआधी धडक दिली. मात्र पाच दिवसांपासून अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने मॉन्सूनची चाल थांबली आहे. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंतची मॉन्सूनची सीमा कायम आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/monsoon-pauses-heavy-rain-expected-in-konkan-and-vidarbha#goog_rewarded

माहिती शेअर करा