यंदाचा हंगाम बेदाणा निर्मितीपासून द्राक्षाची टंचाई भासली होती. त्यामुळे बेदाण्याचा हंगाम एक महिना अगोदर थंडावला आहे. सद्यस्थितीला पाच टक्के शेडवर बेदाणा तयार करण्याचे काम चालू असून, येत्या आठ दिवसांत हंगाम पूर्णपणे बंद होणार आहे. राज्यात बेदाण्याचे उत्पादन ३५ टक्क्यापर्यंत घटण्याचा प्राथमिक अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.
बेदाणा निर्मितीच्या पट्यात सुमारे तीन हजाराहून अधिक शेड आहेत या शेडवर डिसेंबरपासून बेदाणा तयार करण्याचे नियोजन केले जाते.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/raisin-production-season-has-cooled-down-production-has-decreased-due-to-grape-shortage-rat16

माहिती शेअर करा