जिल्ह्यातील कापूस, सोयाबीनसाठी विमा भरलेल्या ९ लाख ५५ हजार ५३२ अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरगत २५८ .८२ कोटी रुपयांचा २५ टक्के अग्रिम विमा परतावा मंजूर झाला आहे. परताव्याची हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्याचे काम सुरु आहे.
कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल. त्यांनतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत विमा मिळणार, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
https://agrowon.esakal.com/agro-special/soybean-and-cotton-growers-in-nanded-get-relief-under-pmfby