खतांची टंचाई, त्यासंबंधीच्या अडचणी या बाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, तक्रारींचे निरसन होण्यास मदत व्हावी यासाठी जिल्ह्यात किती खते उपलब्ध आहे, कुठल्या विक्रेत्याकडे कुठले खते किती उपलब्ध आहे, याची सविस्तर किंवा तालुकानिहाय माहिती ‘एका क्लीक’वर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व शासनाच्या कृषी विभागाने या संबंधी कार्यवाही केली असून, त्यासाठी एक ब्लॉग तयार झाला आहे. त्यात प्रत्येक तालुक्याची किंवा जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमधील खत विक्रेत्यांकडे किती खत उपलब्ध आहे, याची माहिती मोबाईलवर शेतकरी पाहू शकणार आहेत.

https://adozpjalgaonfertilizer.blogspot.com/p/ado-zp-fertilizer-stock-jalgaon.html हा ब्लॉग पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करता येईल. आपल्या तालुक्यात कोणते खते उपलब्ध आहेत, कोणत्या दुकानात, किती साठा आहे, याची माहिती मिळेल. तसेच रोज यात खतांची माहिती अद्ययावत किंवा अपडेट केली जाईल. अनेकदा दुकानात खते असतात, पण ती मिळत नाहीत. विक्रेते शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देत नाहीत.

खत का मिळत नाही, याची नेमकी, पूर्ण तपशिलासह तक्रार शेतकरी या ब्लॉगच्या मदतीने करू शकणार आहेत. खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यात खतांची मागणी असते. खत वापरात जळगाव जिल्हा राज्यात पुढे आहे. त्यात अनेकदा शेतकऱ्यांना खतांबाबत अडचणी येतात. आपल्याला हवे असलेले खत कुठे मिळेल, यासाठी शेतकरी चार-पाच दुकानांवर जाऊन चौकशी करतात, माहिती घेतात.

खतांसाठी वेळ वाया घालवून वणवण फिरण्याची समस्याही या ब्लॉगमुळे दूर होऊ शकणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी विकास बोरसे, जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, मोहीम अधिकारी अविनाश खैरनार व अन्य अधिकारी, वरिष्ठांनी यासंबंधी कार्यवाही केली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/fertilizer-stock-now-just-a-click-away-for-jalgaon-farmers-sai29

माहिती शेअर करा