पुढील पाच वर्षात अन्न, कृषी आणि सागरी उत्पादन निर्यात १०० अब्जपर्यँत पोहचण्याची क्षमता आहे,असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील इंडसफूडच्या कार्यक्रमात केलं. यावेळी त्यांनी देशातील अन्न चाचणी प्रयोगासोबतच शाश्वत शेती प्रक्रियेवर मत व्यक्त केलं.
गोयल म्हणाले ‘देशातील अन्न उद्योगासोबत सरकार शेती प्रक्रिया शाश्वत करण्यासाठी प्राधान्य देत आहे. तसेच सेंद्रिय शेती आणि अन्न उत्पादनांसाठी प्रोत्साहन देत आहे. देशातील सेंद्रिय शेतीमध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे. सरकारने सेंद्रिय खाद्यपदार्थांसाठी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ केली आहे. ”अशी गोयल म्हणाले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा