सर्वसामन्यांच्या केवळ चर्चत असल्यासारखे वाटणारे ‘ए आय’,अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान हळूहळू कळत न कळत त्यांचे जीवनमान व्यापत आहे. मानव आतापर्यंत काळाबरोबर चालत आल्यानेच अनेक संकटावर मात करीत त्यांची प्रगती झाली. आद्योगिक क्रांतीला (मशीनचा वापर) तीनशे वर्ष होऊन गेली आहेत. शेतीचे यांत्रिकीकरण तसेच काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) ही आद्योगिक क्रांतीचीच देणं आहे. यामुळे शेतीचे उत्पादन वाढले, शेतीमालाचा दर्जाही सुधारला आहे. परंतु काटेकोर शेतीच्याही मर्यादा आता पुढे येत आहेत, शिवाय त्यातील अडचणीही वाढत आहेत.
अशावेळी ‘ए आय ‘ तंत्रज्ञानाचा शेतीत वापर काळजी गरज म्हणूनच आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. बारामती येथे ‘ए आय’ ऊस शेतीचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी झाला आहे. या प्रयोगाचा राज्यभर विस्तार करण्याच्या हालचाली देखील सुरु आहेत एवढेच नव्हे तर ‘ए आय’ वापराने खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ हेही या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

https://agrowon.esakal.com/sampadkiya/ai-in-agriculture-article-on-agrowon-rat16?utm_source=website&utm_medium=related-stories

माहिती शेअर करा