नैसर्गिक शेतीवरील राष्टीय अभियानास मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याकरिता २४८१ कोटी खर्च येणार असून, सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत स्वतंत्र योजना म्हणून, नैसर्गिक शेती राष्टीय अभियान (नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग: एनएमएनएफ) राबविले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा