राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला,वाशीम,यवतमाळ,वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/1400-crores-of-crop-insurance-deposited-in-farmers-accounts-rat16

माहिती शेअर करा