सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांत बेदाण्याची आवक मंदावली असून मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी वाढली आहेत. बेदाण्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

गतवर्षी राज्यात बेदाण्याचे तीन लाख उत्पादन झाले होते सध्या राज्यात अंदाजे २५ ते ३० हजार टन बेदाणा शिल्लक आहे, असा अंदाज बेदाणा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. सांगली,तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजार समितीत सौद्यात सरासरी दीड ते दोन टन आवक होत आहे त्यापैकी पन्नास टक्के बेदाण्याची विक्री होत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा