डेहराडून येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) १९६६ मध्ये भॊगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) संबंधित प्रशिक्षणासाठी ‘इंडियन इन्स्टिटयूट फॉर रिमोट सेन्सिंग’ हि संस्था स्थापन केली आहे. उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या जीआयएस अँड आरएस वापरासंबंधीचे सर्व प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. म्हणजे ही प्रणाली कशी वापरायची, कुठे वापरायची इ. भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाला या प्रणालीच्या वापराचे महत्व ३० ते ४० वर्षांपूर्वीच समजले असले तरी त्याचा नागरी विभागाच्या विविध योजनांसाठीच प्रामुख्याने वापर केला जात आहे. ग्रामीण भागातील विकासाशी संबंधित विभागांनी फारसा घेतल्याचे दिसून येत नाही. हे तंत्रज्ञान सर्वव्यापी असून, सर्व विभागांनी त्याचा जितका वापर करायला हवा , तितका झालेला नाही अर्थात त्याला केवळ प्रशासनाची अन्यथा इतकेच कारण नसून अन्यही अनेक कारणे होती.
अधिक माहितीसाठी क्लिक करा