भारत देशाने दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केली आहे. २०४७ भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष असून, तोपर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट्य केंद्र सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी ७ ते १० टक्के वाढीच्या निरंतर गतीने १८००० डॉलर दरडोई उत्पनासह ३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण आवश्यक आहे, विशेषतः कृषी क्षेत्रात मूलभूत परिवर्तन अत्यावश्यक ठरते. कारण आजही शेती हे केवळ उपजीविकेचे आणि अन्नसुरक्षेचे साधन नाही तर अल्प उत्पन्न, गरीब आणि असुरक्षित घटकांसाठी देखील त्याचे विशेष महत्व आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा