सिंधुदुर्गातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहर करपल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून २५ ते ३० टक्केच काजू उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.
लांबलेल्या पावसामुळे या वर्षी काजूच्या झाडांना पालवी आणि मोहर विलंबाने आला. त्यामुळे दरवर्षी जानेवारीत सुरु होणार काजू हंगाम यावर्षी काही भागात फेब्रुवारी अखेरीला तर संपूर्ण जिल्ह्यात मार्चमध्ये सुरु झाला मार्च अखेरीला काजूला बहर आला. त्यामुळे आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
बहुतांश शेतकऱ्यांच्या बागेतील काजू बी निवडून झाली आहे. तर काही ठिकाणी पालापाचोळ्यात पडलेली बी एकत्र करण्याचे काम सुरु आहे. साधारपणे २५ ते ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज शेतकऱ्यांकडून सांगितला जात आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/cashew-season-in-sindhudurg-district-in-final-stage